बुलडाणा जिल्ह्याच्या क्रीडा विभागामार्फत आपले स्वागत आहे.
महाराष्ट्र राज्यातील क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाची स्थापना सन १९७१ मध्ये करण्यात आली. या संचालनालयाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील या कार्यालयामार्फत शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन तसेच राज्य शासनाच्या विविध क्रीडा विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. राज्य आणि जिल्हा स्तरावर शासनामार्फत अनेक उपक्रम व योजना राबविल्या जातात, ज्या खेळाडूंना व्यासपीठ, सुविधा व प्रोत्साहन प्रदान करतात. या सर्व योजनांची यशस्वी अंमलबजावणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय करत असतो. क्रीडा ही मानवाला लाभलेली एक निसर्गदत्त देणगी आहे. प्रत्येक व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे क्रीडा क्षेत्राशी जोडलेली असते — कोणी खेळाडू म्हणून, तर कोणी मार्गदर्शक, आयोजक किंवा समर्थक म्हणून. समाजाच्या सर्वांगीण विकासात क्रीडेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.